सव्यसनाची होण्याकरित मी माझा उजवा हात देईन.
रस्त्यात जिथे तुला वळण (दुभाजक) लागेल, तिथे तू वळ.
केवळ निरिक्षणातून तुला बरेच काही दिसून येईल.
आता तिथे कोणी जात नाही. तिथे खूपच गर्दी असते.
विचार करीत असताना मी एकाग्र होऊ शकत नाही.
पूर्वी जसे असे तसे तिथे भविष्यात असणार नाही
माझ्या मुलांना मी विश्वकोश घेऊन देणार नाही.मी जसे शाळेत जात असे त्यांना जाऊ दे.
आम्ही हरवून गेलो होतो पण थोड्याच वेळात आम्ही बरेच अंतर कापले होते.
माझ्याबद्दल त्यांनी सांगितलेल्या गोष्टींपैकी निम्म्या गोष्टी खोट्या आहेत.
निकेलला आता कवडी मोलाची किंमत राहिलेली नाही.
त्याच गोष्टी पुन्हा पुन्हाअनुभवण्यासारखे होते.
संपेपर्यंत ते पूवीसारखे असणार नाही.
श्रीमती लिंडसे म्हणाल्या, तुम्ही नक्कीच शांत आहांत. योगी बेरा म्हणाले,"आभारी आहे, पण तुम्ही ही रागीट असल्याचे वाटत नाही.
जर जग परिपूर्ण असते, तर त्याचे अस्तित्वच राहिले नसते.
| Entry #12394
|
हर तर्हेने कौशल्यपूर्ण होण्यासाठी मी दोन्ही बाजू वापरेल
आयुष्याच्या वाटेवर समोर येणार्या प्रत्येक संधीचा उपयोग करा
तुम्ही जर नीट लक्ष देऊन पाहिले तर निरीक्षणाद्वारे तुम्हांला खूप काही शिकता येईल
गर्दीत असून परिचयाचे कोणीही नसल्याने एकटेपणा जाणवणे
जेव्हा मी विचार करत असतो तेव्हा मी एकाग्रचित्त हो़ऊ शकत नाही
तुम्हांला असा भविष्यकाळ यायला नकोय, जो तुम्हांला अपेक्षित आहे, तसा नाहिये.
माझ्या मुलांना माझ्याप्रमाणे आयुष्यातील वाटचाल करतांना खाचखळग्यांचा अनुभव यायलाच हवा, मी त्यांचा मार्ग सोपा आणि सहज करून देणार नाही.
आम्ही भले हरलो असू, पण आम्ही निश्चितच प्रगती करत आहोत
माझ्याविषयीच्या असत्य गोष्टी जे पसरवतात, त्यातील अर्ध्या बाबी ह्या सत्य नाहीत.
एखाद्या वस्तू / व्यक्तीचे अवमुल्यन झाल्यावर त्यावर वेळ / पैसा घालवण्यात अर्थ नसतो, ती तुच्छ बनते.
अशी अनुभूती होतेय की याचि देही याचि डोळा हा क्षण पुर्वी घडून गेलाय आणि ह्याक्षणी त्याची पुनरावृत्ती होतेय
खेळ तोपर्यंत संपत नाही, जोपर्यंत खेळाची संपुर्णपणे अखेर होत नाही, चमत्काराला वाव आहे, काहीही घडू शकते.
तोपर्यंत स्वतःला शर्यतीतून बाद समजू नका.
सौ. लिंडझे: " तुम्ही निश्चितच तणावरहित (शांत) दिसत आहात". योगी बेरा: " धन्यवाद, तुम्ही स्वतः ही एव्हढ्या काही गरम (आकर्षक) दिसत नाहिये"
जगात परिपुर्ण असे काहीही नसते, जर ते परिपुर्ण असेल तर ते जग नसेल
| Entry #12421
|
उजवा हात देऊन सुद्धा मी कुठल्याही हातांने सहजतेने वापर करु शकतो.
जर नशिब तुमच्या घरचे दार वाजवत असेल तर जरुर उघडा
नुसत्या बघण्याने सुद्धा तुम्ही काहीतरी नीट पाहु शकता
कुणीही तिथे जात नाही. खुप गर्दी आहे.
विचार करत असताना मी एकाग्र नसतो.
पुर्वी सारखे भविष्य कधिच नसते.
मी जसा शाळेत गेलॊ तसा मुलांना शाळेत जाऊ देत. मी त्यांना कधीच विश्वकोश आणणार नाही.
आपण हरवलो आहोत, पण त्यात मजा येत आहे.
माझ्या बाबतच्या खोट्या गोष्टी या काही ख-या नाहित बरका!
सोन्याला कवडीमोल किंमत आहे
| Entry #12368
|
"सव्यसाची होण्यासाठी मी उजवा हात कापून टाकायला तयार आहे."
"जेव्हा एक रस्ता दोन रस्त्यांमध्ये विभागतो, तेव्हा दुसराच घ्यावा."
"केवळ बघण्यातून तुम्ही प्रचंड निरीक्षण करू शकता."
"तिथे इतकी गर्दी आहे की, तिथे आता कुणीही जाऊ शकत नाही."
"मी जेव्हा विचाराधीन असते तेव्हा मी चित्त एकाग्र करू शकत नाही."
"पूर्वी जसा असायचा तसा भविष्यकाळ आता राहिलेला नाही."
"माझ्या मुलांना मी पुस्तकी ज्ञान देणार नाही. माझ्यासारखंच त्यांनाही अनुभवातून शिकू दे."
"आम्ही वाट हरवलोय, पण तरीही आम्ही त्याचा आनंद घेतो आहोत."
"माझ्याबद्दल ते पसरवत असलेल्या खोट्या वदंतांपैकी अर्ध्या ख-या नाहीत."
"निकेलला कवडीची पण किंमत नाहीये."
"हे एखाद्या देजा-वू अनुभवासारखंच आहे, पुन्हा पुन्हा घडणारं."
"जोपर्यंत हे संपूर्णपणे संपत नाही तोपर्यंत हे संपलंय असं मी म्हणणार नाही."
मिसेस लिंडसे: "तुम्ही खरंच "कूल" दिसताय." योगी बेरा: "धन्यवाद, पण तुम्ही काही तेवढ्या "हॉट" नाही दिसत आहात."
"जग जर परिपूर्ण असतं, तर ते तसं झालं नसतं."
| Entry #12442
|
savyasachi honyasathi mi majha ujva bahu dein.
jevha tumchya vatela phata phutto tevha phatyane ja.
nuste baghunhi tumhi barech nirikshan karu shakta.
tithe ata konihi jaat nahi. tithe phar gardi aste.
mi vichar karat astana majhe chitta ekaagra hot nahi.
bhavishya poorvisarkhe rahile nahi.
mi majhya mulansathi dnyanakosh annar nahi. majhyasarkhe tyanna chalat shalet jau det.
amhi harloy pan amhala maja yetie.
majhyabaddalchya ardhya thapa kharya nahit.
kavdila ata paishachehi mol nahi.
he deja-vu sarkhe ahe, tech puha parat.
te sampeparyant samplele nahi.
sau Lindsay, "tumhi nakkich akarshak dista'. Yogi berra : 'dhanyawad. tumhi matra titkyasha kadak disat nahi'
jag jar paripoorna aste tar te aslach naste.
| Entry #12253
|
- “सव्यसाची होण्यासाठी मी माझा उजवी बाहू देईन.”
- “जेव्हा तुम्ही रस्त्यातील फाट्याला याल तेव्हा, तो घ्या.”
- “निव्वळ पाहून तुम्ही बरेच निरीक्षण करू शकता.”
- “आता तिथे कोणीच जात नाही. ते खूप गजबजलेले आहे.”
- “विचार करीत असताना मी सकेंद्रित होऊ शकत नाही.”
- “भविष्य जसे असायचे तसे नाही.”
- “मी माझ्या मुलांसाठी ज्ञानकोश विकत घेणार नाही. मी गेलो तसे त्यांनाही जाऊदे शाळेत.”
- “आम्ही हरलो आहोत, पण आम्ही चांगला काळ घालवीत आहोत.”
- “ते माझ्या बाबतीत सांगत असलेल्या अर्ध्या थापा खर्यात नाहीयेत.”
- “आता निकेलला नाण्याएवढेही मूल्य नाही.”
- “हे पूर्वी घडल्यासारखेच आहे, परत सर्वत्र.”
- “ते संपलेले नाही जोवर ते संपत नाही.”
- श्रीमती.लिंडसे: “तुम्ही नक्कीच थंड दिसताय.” योगी बेरा: “धन्यवाद, तुम्ही स्वतः सुद्धा काही खूप गरम नाही दिसत आहात.”
- “जर जग परिपूर्ण असते तर, ते नसतेच.”
| Entry #11360
|
मला उभय हस्त निपुण होण्यासाठी माझा उजवा त्याग करावा लागेल.
रस्त्यात एखादा काटा भेटला तर तो जरूर उचला.
तुम्ही नुसते पाहूनच खूप काही निरखू शकता.
तिथे फार गर्दी असल्यामुळे तिथे कोणीच जात नाही.
मी विचार करताना एकाग्र होऊ शकत नाही.
भविष्यकाळ तसा नसणार जसा तो पूर्वी असायचा.
माझ्या मुलांना मी विश्वकोश घेऊन देणार नाही, त्यांना तसेच शाळेत जाऊ दे जसा मी गेलो.
आम्ही हरलो आहोत, पण आम्ही चांगला वेळ घालवत आहोत.
त्यांनी माझ्या बद्दल सांगितलेलं अर्ध्यापर्यंत असत्य हे मुळात सत्य नाही.
आठ -आण्याला आता चार-आण्याची पण किमत राहिली नाही.
पुन्हा एकदा हे सर्व काही आधी सुद्धा घडून सारखे वाटते.
संपूर्ण संपल्याशिवाय ते अजून संपलेले नाही.
श्रीमती लिंडसे - ''तुम्ही आज फार कूल दिसता'' योगी बेर्रा- ''धन्यवाद, तुम्हीसुद्धा इतके हॉट दिसत नाही.''
जर हे जग परिपूर्ण असते, तरी ते परिपूर्ण नसते.
| Entry #12440
|