इकडच्या तिकडच्या गोष्टी Շարքի հրապարակողը: Varsha0714 (X)
|
Varsha0714 (X) Միացյալ Նահանգներ ճապոներենից անգլերեն + ...
भाषांतर क्षेत्राशी निगडीत, मराठी भाषेसंबंधित बातम्या, लेख कुणाच्या वाचनात आले तर त्याविषयी तसेच प्रोझ.कॉमसंबंधित बाबींवरही चर्चा करुया.
[Edited at 2010-07-15 13:07 GMT] | | |
Varsha0714 (X) Միացյալ Նահանգներ ճապոներենից անգլերեն + ... TOPIC STARTER प्रोझ.कॉम व्हर्च्युअल कॉन्फरन्स २०१० | Jul 15, 2010 |
नुकतीच प्रोझ.कॉम व्हर्च्युअल कॉन्फरन्स २०१०साठी नोंदणी सुरु झाली आहे.
ही कॉन्फरन्स ३ स्वतंत्र दिवशी असणार आहे. (३० सप्टें, १३ ऑक्टो व १० नोव्हें)
आपल्यापैकी कोण कोण उपस्थित राहणार आहे?
मी उपस्थित असेन, कालच नोंदणी केली.
अधिक माहितीसाठी http://www.proz.com/translation3/freelance-translators पहा. | | |
Varsha0714 (X) Միացյալ Նահանգներ ճապոներենից անգլերեն + ... TOPIC STARTER अपेक्षेनुसार! | Jul 30, 2010 |
अपेक्षेनुसार कोणीही प्रतिसाद दिला नाही!
चांगलं आहे!!!! कीप इट अप! | | |
Varsha0714 (X) Միացյալ Նահանգներ ճապոներենից անգլերեն + ... TOPIC STARTER
|
|
Varsha0714 (X) Միացյալ Նահանգներ ճապոներենից անգլերեն + ... TOPIC STARTER
भाषांतरकार मित्र/मैत्रिणींनो,
मी यंदाच्या ऑक्टो-नोव्हेंबरमध्ये भारतात असेन. माझे वास्तव्य मुंबईत असेल.
आपण मुंबईत ठरवून भेटायचं का? प्रोझच्या भाषेत ’powwow' करायचं का?
त्यानिमित्ताने एकमेकांशी प्रत्यक्ष ओळख होईल.
आपलं मत ऐकायला आवडेल. | | |
Mrudula Tambe Հնդկաստան Local time: 09:10 անգլերենից մարաթի + ... Ի հիշատակ
Varsha Pendse-Joshi wrote:
मी यंदाच्या ऑक्टो-नोव्हेंबरमध्ये भारतात असेन. माझे वास्तव्य मुंबईत असेल.
आपण मुंबईत ठरवून भेटायचं का?
प्रिय वर्षाताई,
ह्या मंचावर जास्त प्रतिसाद येत नसले तरी केवळ वाङ्मातृ मराठी भाषेच्या प्रेमापोटी आपण ज्या निष्ठेने हा मंच चालविता त्याचे कौतुक वाटते. "की घेतले न हे व्रत अम्ही अंधतेने"... असे हे व्रत असिधारा व्रतच म्हणायला हवे. असो.
आपण भारतात याल तेव्हा मी तर नक्की भेटेनच पण अजून १-२ अनुवादक सोबत येतील असे पण पाहीन (ह्यातला ही र्हस्व की दीर्घ?).
कळावें,
लोभ आहेच पण तो दिवसागणिक वृद्धिंगत व्हावा,
आपली व सदैव विनम्र,
मृदुला. | | |
Varsha0714 (X) Միացյալ Նահանգներ ճապոներենից անգլերեն + ... TOPIC STARTER दादरमध्ये भेटायचं का? | Oct 18, 2010 |
मृदुलाताई,
प्रतिसादाबद्दल आभारी आहे. अजून कोणी भाषांतरकार आल्यास अजून उत्तम. (प्रोझवरील बाकी भाषांतरकारांनो, वाचताय ना हे? )
नोव्हेंबरमध्ये भेटण्याची कल्पना कशी वाटते? माझे वास्तव्य दादरमध्ये असेल. तर दादरमध्येच भेटायचं का? तुम्हाला अजून कुठले ठिकाण सुचते आहे का?
सर्व सूचनांचे स्वागत आहे. | | |
Mrudula Tambe Հնդկաստան Local time: 09:10 անգլերենից մարաթի + ... Ի հիշատակ
Varsha Pendse-Joshi wrote:
तर दादरमध्येच भेटायचं का?
दादरच उत्तम, आपल्या दोघींनाही सोयीचे आणि इतरांना पण वाहतुकीच्या दृष्टीने मध्यवर्ती.
[जन्मभूमी असल्या कारणाने दादर माझे आवडते पण आहे... 
नमो मातृभूमी जिथे जन्मलो मी,
नमो पुण्यभूमी जिथे वाढलो मी,
नमो कर्मभूमी जियेच्याच कामी
पडो देह माझा, सदा ती नमी मी... ] | |
|
|
Varsha0714 (X) Միացյալ Նահանգներ ճապոներենից անգլերեն + ... TOPIC STARTER
चालेल, दादरलाच भेटू. कुठे आणि कधी ते ठरवावे लागेल. मला नोव्हेंबर मध्ये (दिवाळीनंतर) जमेल.
आणि एखाद्या शनिवार-रविवारीच भेटू म्हणजे कामाचा दिवस नसल्याने निवांत बोलता येईल. | | |